प्रिये मी तुझ्या प्रेम रुपी वादळात पुरता अडकलो आहे. आत्ता माझी सुटका तुझ्याच हातात आहे.
मला माहित आहे हि वादळ सगळ बरबाद करत असत. आणि तरीही मी चान्स घेतो आहे.
तुझ्या प्रेमात मला रातांधळेपणा झाला आहे कि काय अशी पुसट शंका मला येते आहे. कारण रात्रीच्या अंधारात मला चांदण्या न दिसता नुसताच धूर दिसतो आहे. खात्री करण्यासाठी मी हवामानासंबंधित बातम्याही वाचल्या आहेत. प्रेमात अस होत असत म्हणतात.
प्रिये (लाजून) तुझ्यासाठी मी तारे, चंद्र तोडून आणू शकतो . फक्त तू त्याच काय करशील तेवढ सांग. काही करणार नसशील तर कशाला उगाच त्रास.
माझ्या प्रेमाचा स्वीकार कर नाहीतर बरबाद कर, शेवटी तू वादळ आहेस
तुझाच आणि तुझाच
प्रमोद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा