का, कोणासाठी आणि कशासाठी याच उत्तर मला हि माहित नाही, तरीही मी जगतो आहे.

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

छोटी प्रेम कथा

तो -"आज माझे हृदयाचे ऑपरेशन आहे"
ती -"माहित आहे"
तो -"आय लव यु!"
ती -"आय लव यु टू!"
ऑपरेशन नंतर तो शुद्धीत येतो तेव्हा त्याला शेजारी कोणीच दिसत नाही.
तो तिला जोर जोरात हाका मारतो. "कुठे गेलीस मला सोडून"
आणि त्याच्या हृदयातून आवाज येतो, "तुला काय वाटते, तुला दुसरे हृदय कोणी दिले?"
"मी येथेच आहे, तुझ्या अगदी जवळ"
तो जोरजोरात रडायला लागतो !

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

एका वेड्याची कहाणी

त्याला येताना  पाहून, फार वर्षाचे जुने असलेले ते वडाचे झाड खुश झाले. आणि त्याला आपल्याकडे बोलाऊ लागले,
"अरे ... मुला, ये ऐकतोस ना ?"
काही काळासाठी त्याला आश्चर्य वाटले. पण काही काळासाठीच. आजकाल त्याच्या बरोबर कोणीही बोलू शकते, हे त्याला  माहित होते. लोक त्याला वेडा म्हणायची. त्याला त्याची पर्वा होती कुठे, तो आपला आपल्याच धुंदीत मस्त असायचा.
त्याने वळून झाडाकडे पाहिले. 
"काय बोलतोस मित्रा, कसा आहेस. एवढा काळ लोटला पण तू अजून बदलला नाही बुवा"
"अस कस बोलतोस, बदल तर झाल्याय, खूप बदल झालाय. तुझ्यात, माझ्यात आपल्या सर्वांच्यात"
"पण मग दिसत नाही कसा तो मला"
"अरे दिसेल कि, डोळे उघडे ठेऊन पाहिलस कि दिसेल तुला बदल झालेला. ते जाउ दे, एवढ्या वर्षानंतर दिसलास. कोठे होतास"
"मी कोठे असणार भटकत असतो एकटाच .......  हो , बहुतेक एकटाच"
"बहुतेक"
"तू सांग कसा आहेस, तू तर कोठेही भटकू शकत नाहीस, आपला वर्षानुवर्ष एकाच जागेवर. कसा राहू शकतो तू एका जागेवर, मी नाही राहू शकत असा"
"हम्म्म .......... ती एक गंमतच आहे, अस वर्षानुवर्ष एका जागेवर रहायची"
त्या वर तो चेहऱ्यावर चिडचिडेपणाचे भाव आणून म्हणाला, "छे, यात काय आली गंमत"
खर तर वडाच्या त्या झाडाला अस संभाषण नको होत, त्याला वेगळाच काही तरी बोलायचं असाव, अस त्याला वाटल. हे नेहमी व्हायचं, समोरच्याला काय बोलायचय हे त्याला कळायचं आणि मग समोरचाही त्याच मुद्द्यावर संभाषण चालू ठेवायचा. किती अजब होत हे, पण त्याला नाही वाटायचं हे अजब, आणि लोकांना ............. त्यांच्या दृष्टीने तो तर वेडाच होता ना. 
मग झाडच बोलले ......... 
"तुम्ही दोघ बसायचात माझ्या फांद्यांच्या सावलीत, मजा  यायची मला ........... तुम्ही आलात कि बघत रहायचो तुमच्या दोघांकडे. एक सांगू, अस मी कोणाला सांगत नाही पण तुला म्हणून सांगतो, तुम्ही दोघ येथे बसायला याचातना तेव्हा तुम्हाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मी माझ्या फांद्या तुम्ही बसलेल्या जागेवर एकवटून घ्यायचो. ........... हो पण तुमच्यासाठी नाही बर का, मला खरचं तुम्ही माझ्या विसाव्याला बसलेलं खूप आवडायचं. किती बोलायचात तुम्ही, आणि काय काय बोलायचात, खरचं तुमच्या सारख कोणी नाही आल पुन्हा, आत्ताची सगळी पोर एकदम लुच्ची ...... त्यांचे  धंदे पाहून मलाच ढवळायला  होत. नको वाटत त्यांच्याकडे पहाणे."
झाडाच हे बोलण ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आल. ते नेहमीच यायचं. त्यांच्या शाळे जवळचा दगड, ज्यावर ते दोघेही बसायची, तोही अशीच आठवण काढत होता. सगळेच त्यांची आठवण काढत  होते, त्याच्या इमारतीची गच्ची, ते दोघ पावसात ज्या छत्रीत एकत्र यायचे ती छत्री आणि अजून बरेच काही त्याच्याशी या विषयावर बोलायचे आणि काही बोलणार होते ............. तो त्यांना त्याची आणि तिची  कहाणी  सांगायचा. सांगून झाल्यावर ऐकणारा (नेहमीच) खूप रडायचा, मग शेवटी यालाच त्याची समजूत घालायला लागायची, तो समजूत घालायचाही. जीवन म्हणजे काय आणि ते कसे असते ते तो त्यांना समजावून द्यायचा..... एवढे सांगितल्यावर मग तो आयुष्यावर बोलायचा, "आयुष्यात कधी रडायचं नाही, आयुष्याच कामच मुळी रडवायचं असत. मग अस रडून त्याला आपल काम फत्ते झाल्याचा आंनद मिळूवून कशाला द्यायचा."
असच  काहीतरी तो भरपूर बोले, समोरचा समजला अस त्याला जेव्हा वाटे तेव्हा तो निघून जाई"
आत्ता हि संभाषण नेहमी सारख त्याच विषयावर आल होत,
तो आणि ती ......... त्याचा कधीहि  न संपणारा प्रवास.
"अरे तुम्ही माझ्या सावलीत बसायचा हे खर तर माझ्यासाठी भूषनच  होत, तुमच्या सारखे प्रेमी मी आयुष्यात कधीच नाही बघितले, काय प्रेम होते ते............  तो आवेग, ते व्यक्त होण, ते एकमेकात सामावून जाण, एकरूप होण... मी पहिल्यांदाच पाहिलं ते.  आज एवढ्या दिवसांनी दिसलास मला.  
आत्ता या क्षणी मला ते क्षण पुन्हा दिसू लागलेत. 'ती तुझ्या मिठीत आहे, तुझ्या छातीवर डोक टेकवून तुझ्या डोळ्याच्या आरपार पहात आहे. तिच्या डोळ्यात विश्वाच गूढ मला दिसतंय, आणि तुझ्या डोळ्यात तेच विश्वाच  गूढ  तिने उलघडले दिसतेय." मला पुन्हा पुन्हा हेच दिसतय. 
एक दिवस तुम्ही  अचानक गायब झालात, तेव्हापासून मी तुमची  खूप वाट पहातोय. तुम्ही आत्ता याल नंतर याल म्हणून मी तुमची वाट पाहत होतो, पण तुम्ही आलाच नाहीत, आणि आज इतक्या दिवसांनी आपली भेट झाली, तेही तुझ्या  एकट्याशीच, 
तू एकटाच का आलास? तीला का नाही बरोबर आणलेस?
या प्रश्नाची त्याला सवय झाली होती, (हा प्रश्न त्याला अपेक्षितच होता) सर्वांनीच  त्याला हा प्रश्न विचारला होता, या प्रश्नानंतर काय बोलावे हे त्याला पाठ होते. सगळाच नेहमी सारख चाललं होत. नेहमीच असल तरी त्याचा त्याला कंटाळा नव्हता. आत्ता तो झाडाला हि तेच  सांगणार होता. तो तयार झाला. झाडाला त्याची हकीकत सांगावीच लागणार होती, शेवटी ते झाड हि त्याच्या आणि तिच्या प्रेम कहाणीचे साक्षीदार होते, त्याला कळायलाच हवे होते, खरे तर तो त्याचा हक्कच  होता अस त्याला वाटत होत, म्हणून आत्ता तो त्या सगळ सांगणार होता, हातच काहीही न राखता.
आणि  तो बोलू लागला ................
त्याची आणि तिची विस्कटलेली, फाटलेली प्रेम कहाणी 

बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

माझ्या (काहीच्या काही) कविता : 6

1) राहून राहून एकच वाटत .....
दोन हृदय असती तर बर झाल असत नाही.


2) तो : "तुझा हात पुढे करशील का ?"
ती : "कशाला"
तो : "तुझ भविष्य पहायचं होत मला"
ती : "हे घे, बघ"
तो : "तुझ्या हाताच्या रेश्या सांगतायत कि, आज तुला एक मुलगा 'प्रपोज' करणार आहे"
ती  " हो का, कोण आहेत ते महाशय, ते हि रेश्या सांगतात का?"
तो : "हो"
ती : "मग सांग"
तो : "माझ तुज्यावर प्रेम आहे "



3) हल्ली डोळ्यात पाहवत नाही तुझ्या,
रागाने बोलत असतात माझ्याबद्दल .........

4) पुण्याच्या मुली आणि पुण्याची हिरवळ 
हे फक्त पुण्यातच सापडते असे नाही
ते सगळीकडे सापडतात .......
त्यासाठी फक्त या दोघांमधला फरक कळाला पाहिजे.


5) दिवसाची खिडकीत उभी राहत जाऊ नकोस 
तुला पाहून सूर्य आणखीन जळायला लागतो ......

6) डोळे पुसायला जवळ कोणीतरी आपल माणूस असलं कि,
बर वाटत म्हणतात  ...........
पण जवळ आपल माणूस असताना लोक का रडत असतात 

सोमवार, १ ऑगस्ट, २०११

काहीच्या काही कविता

1) आज तुझी खूप आठवण येतेय
आज तरी ये .........
आठवणीत माझ्या

आज तुझी खूप आठवण येतेय
हसून दाखव .........
आठवणीत माझ्या

आज तुझी खूप आठवण येतेय
तोंडाने नको, डोळ्याने बोल .........
आठवणीत माझ्या 



2) एका मुलीच्या,
एका डोळ्यातल्या अश्रुने दुसऱ्या डोळ्यातल्या अश्रुला विचारले
काय भावा, "तू कसा काय बाहेर आलास"
"मी डोळ्यात धुळ गेल्यामुळे बाहेर आलो" आणि तू रे,
मी .......... तिला त्याने सोडून दिले म्हणून 

तुझा हात पुढे करशील का .........

"तुझा हात पुढे करशील का ?"
"कशाला"
"तुझ भविष्य पहायचं होत मला"
"हे घे, बघ"
"तुझ्या हाताच्या रेश्या सांगतायत कि, आज तुला एक मुलगा 'प्रपोज' करणार आहे"
" हो का, कोण आहेत ते महाशय, ते हि रेश्या सांगतात का?"
"हो"
"मग सांग"
"माझ तुज्यावर प्रेम आहे "