1) तू एवढी वेडी कशी आहेस ग
मी रडत होतो
आणि तू आनंदाने हसत होतीस
पहिला पाउस आला म्हणून
२) कधीही न आटणाऱ्या दुखाः च्या डोहात मी अडकलोय
आता तरी ये ......................
रश्शी नाहीतर शिडी घेऊन
३) मी लाडात तिला म्हणालो,
चल आपण चंद्रावर जावू
चंद्राच्या अनंत एकांतात एकमेकांच्या मिठीत राहू.
त्यावर ती म्हणाली,
तिथे जाऊन काय करायचं, तिथे तर शॉपिंग मॉल पण नाही कि ब्युटी पार्लर पण नाही.
४) तू सूर्याची भिन आहेस का ?
तुझ तेज डोळे दिपवून टाकत
५) तू पावसात आमच्या घरी येत नको जाउस,
तुझा मेकअप उतरतो.
आणि तुला तर माहीतच आहे आमच्या घरी लहान मुल असतात म्हणून ........
६) तुझ्या प्रेमाच्या थंड स्पर्शाने
मला सर्दी झाली ........
७) मुलींनो दुचाकी चालवताना तोंडाला स्कार्फ जरूर लावत जा ........
कदाचित त्याने तरी मुलांचे गाडी चालविताना होणारे अपघात कमी होतील.
८) तीला रस्त्यात सायकलच शिट मिळाल
ते तिने जपून ठेवल.........
कधीतरी याची पूर्ण सायकल बनवू म्हणून
९) राग नको मानूस
पण तुझी पप्पी तुझ्या इतकी गोड नाही.
१०) तुझ्या पाया पडतो पण असा घटस्पोट घेऊ नकोस
नंतर फार त्रास होतो.
रेशनकार्डावरून नाव कमी करायला.
११) तो बालपणाचा पाउस, ते बालपणाचे आंगण
ती बालपणाची मैत्रीण, ते बालपणाचे खेळ
खूप आठवण येते तुमची
मी पुढे गेलो तुम्ही मागेच राहिलात यार .........
१२) तू येशील म्हणून ..........
मी शाळेच्या गेट वर अजून उभा असतो .
तुझ्या कडून उधार घेतले ५ रु. खिशात घेऊन
१३) खूप पूर्वी स्वप्नात मी पाउस होऊन बरसत होतो
तुला चिंब चिंब भिजवत होतो ......
आणि हाय रे ..........
तू भिजून गेलीस,
पण मी किती तरी दिवस मुंबईच्या गटारात तुंबून राहिलो होतो.
इथून पुढे काही झाल तरी मुंबईत बरसायचं नाही अस ठरवल आहे मी .........
१४) दुसऱ्याशी लग्न करून मला धोका देणाऱ्या माझ्या प्रियसीला मी म्हणालो,
तू माझ्या प्रेमाची माती केलीस.
ती म्हणाली, तू खरचं बोलतोस
मी म्हणालो "हो अगदी खर बोलतोय मी"
ती लगेच म्हणाली, मग ती माती मला का नाही देत. मी तिचा आमचा बगीचा फुलवण्यासाठी तरी उपयोग करीन
१५) झोका खेळू म्हणालीस .........
झोका खेळताना मध्येच म्हणालीस....
एक सांगू ......... मी लग्न करतेय त्याच्याशी
तू माझी कधीच नाही झालीस..
पण एक बोलू .... मी तुझी रश्शी खराब केली म्हणून रागवू नको माझ्यावर
१६) तू स्त्री आहेस कि,
विश्वाला काळात प्रवास करायला लावणारी
"आदिम शक्ती"
१७) तू घरी उशिरा आलास ,
तेव्हाच मला समजल
तू प्रेमात पडलास म्हणून
१८) जिवंतपणी कधीच आली नाहीस भेटायला
आता तरी ये .........
माझ्या कबरीवर फुल वहायला
१९) कोणी तरी पावसाला थांबायला सांगा
आज मी नवीन कपडे घातलेत.
२०) तू डोळ्यांना काजळ लावत जावू नकोस,
तुझ्या डोळ्यातून तुझ्या हृदयात जाताना
माझ्या तोंडाला काळ फासल्याचा भास होतो
२१) ती म्हणत होती,
"तू मुलगी पाहिलीस कि लगेच घसरतोस."
त्यावर मी उत्तरलो, "नाही ग मुलगी पाहून नाही मी खरचं पाय घसरून पडतो."
मग ती जरा विचार करून म्हणाली, "हो बरोबर आहे ज्याच्या हृदयात चिखल साचला आहे तो घसरणारच."
२२) ती मला प्रश्न विचारत होती,
विश्वाने ज्या गर्भातून जन्म घेतला ते गर्भ कसे असेल रे.
आणि मी हसत होतो..............
उत्तर तिच्या शरीरातच दडलेलं होत म्हणून.
२३) ती मला सांगत होती, तुला माहित आहे का,
माणसाकडे दोन किडन्या असतात आणि माणूस एका किडनीवर हि जिवंत राहू शकतो.
अच्छा मग मी काय करू .................
तस काही नाही बग ....
मला नेकलेस पाहिजे आणि सध्याची तुझी कमाई पाहता तुझ्याकडे दुसरा पर्याय असेल असे वाटत नाही.
२४) आरश्याकडे हि ताकद नाही तुझे सौदर्य दाखविण्याची
मग मी माझे शब्द कशाला वाया का घालवू सांग......
२५) आपल्या प्रियसीला नको नको त्या उपमा देणाऱ्यांसाठी
.
.
शप्पत घेऊन खर सांगतो ..........
तुज्या मरण्याला मी कारण नव्हतो.
मी तर तुला फक्त चंद्र म्हणालो होतो.
तुझ्या चेहऱ्यावर उतरलेलं चंद्रयान इस्रोच होत.
२६) झाडावर प्रेम करा, झाडा खाली नको..
एकदम बरोबर
पण माझ्या प्रेयसीला झाडावर चढता येत नाही त्याच काय ?
२७) तुझ्या नशील्या डोळ्यांचा एक फायदा झाला.
माझा दारूचा खर्च वाचला
२८) एका माणसाच्या अंगावर त्याची बायको पडून तो मेला
दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी होती ...........
"दरड कोसळून नवरा ठार.
सरकार अजून झोपेतच."
२९) आपण दोघ एक जीव आहोत तर ,
लवकर श्वास घे ........
मला गुदमरायला लागलय
30 )लहानपणी हिवाळ्यात ......
मला स्वेटरची कधीच गरज भासली नाही.
मला आईच्या कुशीतच ऊब मिळायची.
३१) माझ्या प्रियसीला बोक्या बरोबर फिरताना पाहून
मी तिला याचा जाब विचारला .......
तेव्हा ती म्हणाली ......
मग, संस्कारच आहेत तसे माझ्यावर. सर्व मुक्या प्राण्यावर प्रेम करायचे
३२) अजूनही विजेचा कडकडाट होतो, तेव्हा मला तिची आठवण येते.
जगात कोठेही भूकंप होतो, तेव्हा मला तिची आठवण येते.
लोकांना उध्वस्त करून जाणारा पूर येतो, तेव्हा मला तिची आठवण येते.
एखाद मोठ वादळ येत, तेव्हा मला तिची आठवण येते.
ती होतीच अशी , विध्वंसक ...............
३३) लग्न झालेला एकजण बोलत होता
लग्न झाल्यापासून .......
मला कायद्याचा खूप आधार वाटतोय
३४) मला शिवण कामात तरबेज असलेली मुलगी हवीय,
माझं फाटलेल आभाळ शिवायला.
३५) जंगलातल्या झाडांना जंगला बाहेर डोकावून पाहायची फार वाईट खोड असते.
यामुळे माणसांना वाटत त्यांना माणसात यायचय म्हणून ......
आणि मग ते झाडाला आपल्यात आणतात.
कोणी बेड म्हणून, कोणी खुर्ची म्हणून तर कोणी काही ............
३६) हा समाज किती भ्रष्ट असतो बघ ना .........
आजचा आतंकवादि उद्याचा देशभक्त असतो.
३७) ती त्याला विचारत होती,
आदर्श नागरिक म्हणजे काय रे .....
तो म्हणाला,
आदर्श नागरिक म्हणजे सरकारने घटनेच्या सहाय्याने तयार केलेले मानवी यंत्र.
३८) निसर्ग असा का असतो ?
आपल्या प्रत्येक नव निर्मितीत
विध्वंसकतेचे रंग का भरत असतो ..........
३९) लोकशाही असो वा हुकुमशाही
समाजाला रंग भरणारा लागतोच ........
समाज लुळा झालाय
४०) माझी आई मला बोलत होती
एवढा बाहेर फिरतोस तर माझ एक काम कर
पावसाला सांग , "मला तू चिंब चिंब भिजव"
एवढ्या दिवस वेळ नव्हता
पण आत्ताच एक मागते ......... कदाचित तू पडशील तेव्हा मी घरात असेल ......
कामात असेल....... घरातल सगळ मलाच कराव लागत ना !
पण तरी हि सिमेंट कॉक्रिटचे बंधन तोडून मला भिजव ......
आज स्त्री म्हणून वाट्याला आलेले सर्व दुखः विसर्जित करेन म्हणतेय मी !!
४१) पावसा तुला डोळे आहेत का ?
असतील तर डोळे उघडे ठेऊन पड.
माझ्या प्रियसीला अस दर वेळी भिजवलेल
मी खपून घेणार नाही.
४२) तू नाही म्हणालीस,
तर दुखाःने माझा जीव जाईल.
तू हो म्हणालीस,
तर खुशीने माझा जीव जाईल,
एकंदरीत काय........
माझं मरण अटळ आहे
४३) तुला चिकन आवडत यासाठीच
मी कोंबडा झालो,
............ ये चल खाऊन टाक मला.
प्रेमात जीव द्यायची माझी तयारी आहे
४४) तू नाही म्हणालीस म्हणून मी माझ्या हातावर वार केलेत चाकूने
आणि ..............
.
.
.
आयला रक्त वाहू लागलय
वाचवा ................
४५) माझ्या डोळ्यात पाहून
ती म्हणाली ,
तोंड नाही धुतलस का ?
काल दिवसभर पाहिलेल्या गोष्टींचे अवशेष अजून दिसतात तुझ्या डोळ्यांवर
४६) बायको म्हणाली नवरयाला ...........
"अहो रात्रीसाठी काय बनवू ?"
नवरा म्हणाला ,
आग बनव काही तरी हलक फुलकं, माझ्या पोटात GAS झाला.
बायको (खुशीत) म्हणाली ...........
देव पावला, कोंग्रेसच्या काळात शेवटी नवराच कामी आला.
४७) दुखः याच नाही कि, तू मला किस दिली नाहीस
दुखः याच आहे, तुझी किस घेण्याचा प्रयत्न करताना
माझी पाच रुपयाची भेळ नकळत खाली पडली
४८) तिला जाग आलेली पाहून
सूर्यही उगवायच्या तयारीला लागला
४९) तुझ गर्भारपण पाहून
मलाही एकदा स्त्री व्हावस वाटल होत.
५०) तुझ हृदय मला देशील का ?
माझ हृदय हल्ली blood circulation च काम नीट करत नाही?
५२) हल्ली झाड शिल्लक राहिली नाहीत
तू नागपंचमीला ये आमच्याकडे
लहान मुल झोका बनवतील तुझ्या लोंबत्या बटांचा
५३) मी वेडा होतो म्हणून तिच्या प्रेमात पडलो नाही
तर ती वेडी होती म्हंणून मी तिच्या प्रेमात पडलो.
५४) तुम्ही प्रेमात पडल्या नंतर
तुमच्या मनात एक स्मशान भूमी तयार करून घ्या.
तिच्या / त्याच्या चुकांना अग्नी देण्यासाठी
५५) माझ एकटेपण तुला काय सांगू ......
ते सांगायला हृदय असाव लागत
'तू म्हणशील माझ्याकडे हि हृदय आहेच कि' .............
पण फक्त हृदय असून भागत नाही त्यात मन हि असाव लागत
त्या मनात चेतना असाव्या लागतात
ते मन काळा समोरही न वाकणारे असावे लागते
वारयाच्या एक झुळकीने खिन्न, आणि आनंदी होण्याची चंचल वृत्ती त्यात असावी लागते
म्हणून म्हणालो ..........
माझ एकटेपण तुला काय सांगू
५६) मी तुला शुभ प्रभात कस म्हणू
स्वतः सकाळच तुला शुभ प्रभात करत असताना
५७) तू सूर्याचं सकाळी पडलेलं कोवळ ऊन आहेस का सांग ?
म्हणजे तुझा फोटो सतत माझ्या बरोबर ठेवायला,
मला "डी" विटामिनची गरज आहे, अस डॉक्टर बोलले होते.
५८) मित्रांनो तुम्ही याल म्हणून मी कट्ट्यावरच उभा होतो
तुम्ही आलाच नाहीत ...................
मी अजून एकटाच उभा आहे
तुम्हची वाट पाहत
५९) मी क्षितीजावर नजर लावून होतो
सूर्याच्या कठोरतेच कोमलतेत रुपांतर होताना पाहायचं होत म्हणून ..........
तिच्या बापाला उगाच गैरसमज झाला
मी त्यांच्या खिडकीवर नजर लावून असतो म्हणून
६०) भेटलास कि शिव्या द्यायचास ...............
मस्त बिंधास रहायचास ...........
बोलायचास "चल यार एक चहा पाज"
साल्या नेहमी चहा पाज म्हणायचास पण पैसे तूच द्यायचास
मस्त होतास यार तू ............
खूप आठवण येते तुझी अजूनही
कधीतरी भेटायला हव आपण
६१) मित्रा खरचं सांगतो, विश्वास ठेव
मी नात्यात कधीच भिंत घातली नाही
फक्त भिंतीत नाते शोधले एवढच ...........
६२) लोक सापांना नाव का ठेवतात ?
ते तर फक्त वरची कातडी बदलतात
माणसं तर आतून बदलतात
६३) मी तिला विचारले
तुझ्या हृदयात मला जागा मिळेल का ?
ती म्हणाली
जागा मिळेल , पण जागेचे भाव हल्ली खूप वाढलेत याची जाणीव आहे का तुला.
६४) तू माझी काळजी घेतेस तेव्हा मला तू माझ्या आई सारखी वाटतेस
यावर ती खळ खळून हसली ...........
आणि म्हणाली
"या आईचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठी आहे"
मी मनापासून बोललो होतो.
तिला हि माहित होत, मी मनापासून बोलतोय ते
म्हणून तर ती खळ खळून हसली होती
कारण तिला माझी मानसिक गरज कळली होती ...............................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा