का, कोणासाठी आणि कशासाठी याच उत्तर मला हि माहित नाही, तरीही मी जगतो आहे.

गुरुवार, २८ जुलै, २०११

(काहीच्या काही) प्रेम कथा - 2

आत्ता तो रागावला  होता, 
"किती वेळ वाट पहाणार" ......... अस काही बाही तो बडबडत होता. 
तेवढ्यात त्याने तिला येताना पाहिले, 
तो मनात मनाला, "येउ दे तिला, नाही बोलणार तिच्याशी"
ती त्याच्या जवळ आली, खूप वेगळी भासली ती त्याला.
वाऱ्यासारखी ........ पारदर्शक .......... आणि गंधाळलेली अशी,
तो तिला काही बोलूच नाही शकला, 
ती येताच त्याला बिलगली, 
म्हणाली, "खूप प्रेम  करते तुझ्यावर"
कितीतरी वेळ ती त्याच्या मिठीत होती, गच्च मिठी मारली होती तिने........
शेवटी त्यानेच तिला बाजूला केले,
आणि म्हणाला, "चल जरा फिरून येऊ, मला लवकर घरी जायला हवं, आईचा वाढदिवस आहे माझ्या."
 ते दोघ रस्त्यावर आले, एका ठिकाणी खूप गर्दी जमली होती, 
अचानक सगळे त्या दोघांकडे पाहू लागले. त्याला  काही  समजेना .........
काय झाले म्हणून तो निरखून पाहू लागला,
एका  ट्रक खाली एक मुलगी मरून पडली होती....... "ती"च होती "ती", 
त्याने ओळखले तिला ............
काहीच बोलला नाही तो तिला .... 
डोळ्यात पाणी जमा झाल त्याच्या .......... अजून गर्दी त्यांच्याकडे आणि तिच्याकडे आश्चर्याने  पाहतच होती.
क्षणात  त्याने निर्णय घेतला .........
त्याची नजर रस्त्यावर शोधक नजरेने  भिरभिरत होती,
 ते  पाहून तिचे हि डोळे भरून आले,
ती हळूच कापऱ्या आवाजात पुटपुटली, "आज आईचा वाढदिवस आहे ना तुझ्या, आजचा दिवस तरी नको"
त्याने एकूण न एकल्या सारखे केले. त्याची भिरभिरती नजर तशीच काहिती शोधत  होती.  त्याने आपला  निर्णय घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा