एक तर वाचून विसरून जावा नाहीतर या गोष्टीवर थोडा विचार करा. तसेही हे काहीच्या काही विचार आहेत.
भीती हि मानवाला निसर्गाकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणावी लागेल.
याच भीतीमुळे मानव संकटा पासून दूर राहतो. मानवाच्या आणि एकूणच सजीव प्राण्याच्या उत्क्रांतीत या भीती भावनेने खूप मोठे कार्य केले आहे. पृथ्वी वरच्या सर्वच सजीवांमध्ये हि भीती दिसून येते.
या भीती मुळेच प्राणी आपले अस्तित्व राखण्यासाठी एकत्र टोळ्यात राहतात किवा आपला इलाखा निश्चित करून त्यात राहतात.
पूर्वी याच भावनेतून मानव हि टोळ्यात राहत होता. पण मानवाच्या एकूण असतूष्टतेमुळे मानव दुसऱ्या टोळ्यांवर अधिकार गाजवू लागले. त्या टोळ्यांला आपल्या अधिपत्या खाली ठेवण्यासाठी शासन व्यवस्था निर्माण झाली. लोकांनी आपल्या शासकाच्या अधिपत्या खाली रहायचे, तो बोलेल तसे वागायचे. यात मानवाच्या हजारो लाखो पिढ्या बरबाद झाल्या आहेत.
आणि आज हि तेच चित्र जगभर पहायला मिळते. वास्तविक हि मानवी जीवनात आलेली मोठी विकृती आहे. अश्या प्रकारे शासन व्यवस्था निर्माण करण्यामुळे लोकांचा काही फायदा झालाच नाही उलट त्यांचे नुकसानच अधिक झाले आहे. जागतिक युध्द, देशादेशातील युध्द याच शासन अरेरावितून उत्पन होतात.
शासकांनी २० व्या शतकात शासन करण्याचे आपले धोरण बदलले आणि त्याला भावनिक आधार देत लोकांना हि त्यात सामील केले तेही नावा पुरते. आजही हि वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
वास्तविक शासन व्यवस्थेमुळे मानव अधिकच भीतीत जगू लागला आणि त्यामुळे गुन्हेगारी हि वाढली. याचा पुरावा म्हणून आपल्याला आदिवासी वनवासी यांच्या कडे पाहता येईल. त्यांच्यात मुळातच गुन्हेगारी वृत्ती नसते. ते शासन व्यवस्थेच्या नियंत्रनात आल्या नंतरच तेही इतरांसारखा व्यवहार करू लागतात.
शासन व्यवस्थेमुळे मानव अधिक अस्वस्थ झाला आहे आणि याच अस्वस्थतेमुळे आज भयान परिस्थिती मानवापुढे निर्माण झाली आहेत. आज मानवच आपला शत्रू बनला आहे तो एकमेकांना संपविण्याच्या हेतूने कार्यरत आहे. जर मानवाला आपली पिढी यापुढेही टिकवून ठेवायची असेल तर शासन विरहीत समाज निर्माण करायला हवा. अर्थात यात कित्येक समस्या दिसतील. आपण हजारो वर्ष शासकांच्या गुलामगिरीत असल्यामुळे आपली मानसिकताच मुळात तिच्याशी जुळवून घेण्याची झाली आहे. त्यामुळे हे कठीण वाटेल. पण आपल्या, ज्यांना आपण रानटी म्हणून हिणवतो त्या पुर्वजांनीच याचे उत्तर देऊन ठेवले आहे.
एकूण काय तर शासन व्यवस्था हि सामाजिक विकृती आहे. आणि ती फार काल टिकून राहणे हि मानवासाठी घातक आहे.
kaahichyaa kaahi
उत्तर द्याहटवा