१) मला सुंदर मुली आवडत नाहीत
कारण सुंदर मुली सुंदर मुलांनाच पसंद करतात
२) लोकांनी जस भ्रष्टाचाराशी जुळवून घेतल
तसच उपोषणाशी हि जुळवून घेतील
३) तुम्ही प्रेमात पडला असाल तर,
एक शिडी स्वतः बरोबर ठेवत जा
उतरायला कामी येते
४) माझ्या बायकोच्या गळ्यातल मंगळसूत्र पाहून
मला फासावर लटकल्या सारख वाटत.
५) प्रेम हळूवार मंद वाऱ्या सारखं असाव
वादळ नेहमीच नुकसानकारक असते
ते पाहायलाच मजा येते
६) तू मल्लिका शेरावत असतीस तर किती बर झाल असत
या मागाईत कपड्याचा खर्च तरी वाचला असता
७) ती तिच्या प्रियकराला रागाने बोलत होती 'तू नेहमी खरचं का बोलतोस. त्यामुळे लोक दुखावतात.'
८) प्रेयसी आपल्या संघ स्वयंसेवक असलेल्या प्रियकराला बोलत होती,
"किती सुंदर असते संध्याकाळ आईच्या मखमली पदरा सारखी, चल एखादी संध्याकाळ आपण एकत्र घालवू"
संघ स्वयंसेवक असलेला प्रियकर म्हणाला, "नको मला संध्याकाळी शाखा लावायची असते."
९) ती म्हणाली, आपला जन्म लोकशाही असलेल्या देशात झाला हे आपले नशीब समज.
मी म्हणालो, दारुच्या किमती वाढल्या पासून लोकशाहीवरचा माझा विश्वासच उडालाय .
१०) ती मला म्हणाली, माझ आभाळ तुला घे तूझ आभाळ मला दे
मी म्हणालो, माझ आभाळ पाहिजे असेल तर नक्कीच घे, पण नंतर बोलू नकोस को माझ आभाळ काळ्या ढगांनी वेढलय म्हणून
११) असण्या पेक्षा नसलेलं बर, म्हणजे काय ग ?
या वर ती म्हणाली , खर खर सांग तू माझ्याशी लग्न करणार आहेस कि नाही ?
१२) बेडकांचा आणि आपला काही संबंध असेल का रे?
कश्या वरून असे बोलतेस .....
पहिल्या पावसात बेडक आणि मानवाच्या सुप्त भावना एकत्र जाग्या होतात म्हणून
१३) एक दिवशी एक एलियन पृथ्वीवर आला, आणि नेमका आमच्याच छतावर उतरला.
नंतर घरात येऊन हिला म्हणाला,
वहिनी एक वाटी साखर मिळेल का?
१४) पावसाचा राग आला होता मला
ती आल्यावर एक थेंब हि पडला नव्हता
१५) माझ हृदय दगड आहे असा तिचा समज असल्याने.
रोज नारळ फोडताना तीला माझी आठवण येते
१६) काय ह्या मुली यांना मस्करीपण सजत नाही
एकदा माझ्या प्रियसीला मी मस्करीत एक ठेऊन दिली
आणि ती कोमात गेली.
काय ह्या मुली यांना मस्करीपण सजत नाही.........
१७) ती मला म्हणत होती ,
घायाळ मनाला आणखी घाव देऊ नकोस
तुझ्या स्वार्थाला प्रेमाच नाव देऊ नकोस.
मी म्हटलो , जायचं असेल तर गप्प जा,
उगाच मेंदू कुरतडू नको
१८) कापून टाकला गळा
आणि मोडला नाही कणा
इथे आख्खा गळाच कापला
आता कण्याच काय लोणच टाकणार
१९) तू परी कथेतील राजकुमारी आहेस का ?
तू हो म्हणालीस, तर मी राजकुमार नाही याचे मला अतीव दुखः होईल
आणि तू नाही म्हणालीस, तर तू खोट बोलतेस असे मी समजेन
२०) जो जो तुला पाहून आकर्षित झाला
तो पुन्हा कधीच दिसला नाही.
खर सांग तू मुलगी आहेस कि, कृष्णविवर
२१) परिस्थितीने भयान रूप धारण केले आहे मित्रा
आता नावाने मुलींची ओळख पटत नाही, तिच्या चप्पलच्या नंबर ने पटते
२२) दिवसा बाहेर नको निघत जाउस तू
खगोलशास्रज्ञ गोंधळून जातील.
दिवसा चांदण कस पडल म्हणून
२३) नावात काय आहे, म्हणत
हीच नाव विचारायचेच राहून गेले .
२४) प्रेमात सैरभैर झालेला एक प्रेमी बोलत होता,
"अगर तू मुझे नही मिली
तो मै दुनिया जला दुंगा"
हि बातमी पसरताच पोलिसांनी तत्काळ हाय अलर्ट जाहीर केला
२५) झाडावर हि प्रेम करा आणि झाडा खाली हि प्रेम करा
पण अगोदर झाडे वाचवा
२६) तूझ्या डोळ्यातल लहानपण असच राहु दे, आयुष्यभर
२७) कुणीतरी चंद्राला सुट्टीवर जायला सांगा.
कारण पृथ्वीला एक चंद्र बास झाला.
२८) प्रेम अमृता पेक्षा गोड असत म्हणतात
पण खर सांगू .....
माझा यावर विश्वास नाही !
२९) खर खर सांग....
तू मुलगी आहेस कि, 'धौती योग चूर्ण'
तुला पाहून पोटात मोकळ मोकळ वाटत
३०) तू कधीतरी येशील या आशेने
मी तुझी वाट बघत अजून उभा आहे.
हातात पिघळलेल आईस्क्रीम घेऊन
३१) ती त्याला म्हणाली आज तोंड धुवून आलास का ,
तो म्हणाला काय झाल काही विशेष
तो ..... काही विशेष नाही रे , म्हटल आज तुला कीस कराव
३२) तुझ्या केसातल प्राणी संग्रालय पाहून
मला तुझा हेवा वाटतो.
३३) तुझ्या केसात साचलेल पावसाच पाणी
मला पावसापेक्षा हवस वाटत
३४) योगायोग बघ .........
ज्या दिवशी तू मला सोडून घेलीस
त्याच दिवशी आमचा ज्योतिषी म्हणाला .......
अभिनंदन तुच्यावरची शनीची वक्र दृष्टी दूर झाली आहे
३५) शाळेचे दिवस किती सुंदर होते
रोज एक chocolate द्यायचो तिला , काय खुश व्हायची ती
शाळेचे दिवस किती सुंदर होते , मस्त आणि स्वस्त
३६) ये आई चल पावसात चिंब चिंब भिजू
आपण दोघे हि लहान होऊ ,
लहान व्हायला काय लागत,
फक्त थोड्याश्या वेडेपणाच भांडवल,
३७) मुलांनो आणि मुलींनो
रस्त्यात चालताना कृपया प्रेमात पडत जाऊ नका .
पावसाळ्यात खड्यांची मोठी समस्या निर्माण होते
३८) तू एक ना एक दिवस येशील
याची पूर्ण खात्री आहे मला
म्हणून हल्ली अस्वस्थ असतो मी
३९)भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या मध्यावर प्रत्येकाचा प्रवास चालू असतो .
अपवाद फक्त तू !!
४०) आपल्या दोघांच मिलन कधी होऊ शकल नाही,
याच मला जरा सुध्दा नवल वाटत नाही ........
भूमितीचा नियमच सांगतो ,
दोन समांतर रेषा कधीच एकमेकींना छेदत नाही.
४१) मी म्हंटल, मी वादळात सापडलो असताना तू मला सावरल का नाहीस.
तू म्हणाली , मी स्वतः सावरल्यावर सावरणारच होते तुला
४२) चंद्राच काय कोतूक करायचं,
तो तर पृथ्वी भोवती स्वतः च घिरट्या घालत असतो
४३) तुझ आभाळ तुला घे
आणि माझ आभाळ मला दे
खूप झाली देवान घेवाण
४४) रस्त्यात चालताना तू हसत जाऊ नकोस
अपघातांची संख्या वाढलीय हल्ली
४५) तू मला आवडतेस
पण सुंदर दिसतेस म्हणून नाही
तू सुंदर आहेस म्हणून
४६) मी तुझ्या प्रेमात पडलो कारण
तू म्हणालीस, मला कोणी भाऊ बहीण नाही, मी एकुलती एक आहे.
मग काल मला मारून गेला तो कोण होता......खोटारडे !!
४७) तुझी पप्पी इतकी गोड होती कि ,
माझ्या ओठांवर मला मुंग्यांची रांग दिसली होती
४८) मला गर्लफ्रेंड नाही हे कोणाला कळू नये म्हणून,
मी स्वतः च माझ्या बाईकची मागची शिट पुसून काढतो
४९) माझा भौतिक शास्रज्ञ मित्र हिला तिचे डोळे मागत होता
संशोधन करायचय म्हणून.......
कारण मीच त्याला बोललो होतो ,
अरे यार मला हिच्यां डोळ्यात विश्व दिसत म्हणून
५०) मागे एकदा साखर मागायला आलेला एलियन
माझ्या बायकोला पळवून घेऊन गेला..........
मला हेच कळत नाही कि
हे एलियन माणसाची मदत करायला एवढे उतावळे का असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा