प्रेमाची व्याख्या : प्रेम हे जळत्या सिगारेटसारखे असून त्याची सुरुवात झुरक्या पासून होते आणि शेवट राखेत होतो.
प्रेमाची दृढ परावर्तीत अभिक्रिया : जेव्हा लैगिक आकर्षणाचा किरण एका ठिकाणाहून (मुलाच्या / मुलीच्या डोळ्यापासून) दुसऱ्या ठिकाणी (मुलाच्या / मुलीच्या डोळ्यापर्यंत) पोहचतो, तेव्हा दृष्टी पटलावर चमकदार प्रतिमा तयार होते. त्यावेळेस "स्मितहास्य" येते. अशा प्रकारे स्मितहास्याची भिन्न लिंगांच्या दोन शरीरांच्या आतील मनाच्या द्रव पदार्थामध्ये देवान घेवाण होते. या क्रियेस प्रेमाची दृढ परावर्तीत अभिक्रिया म्हणतात.
प्रेमाचे वर्गीकरण : (प्रेमाचे दोन प्रकार पडतात )
१) निर्हेतुक प्रेम (प्रामाणिक)
२) सहेतुक प्रेम (अप्रामाणिक)
प्रेमाचे गुणधर्म : १) प्रेम हे रंगहीन आणि माणसाच्या मानसिक स्वाथ्यानुसार क्वचित गुलाबी असून त्याला आल्हाददायक सुगंध असतो.
२) खरे प्रेम माणसाला उत्साही अथवा मूर्ख बनविते.
३) प्रेम हे अत्यंत ज्वालाग्राही आहे.
४) प्रेम हे "विनाश काले विपरीत बुद्धी" आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा