का, कोणासाठी आणि कशासाठी याच उत्तर मला हि माहित नाही, तरीही मी जगतो आहे.

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

काहीच्या काही कविता - ५

1) खूप दिवसा नंतर तो तिला भेटला ........
पूर्वीचा राग विसरून ती त्याच्याशी खूप बोलली,
आणि तोही तितक्याच मोकळे पणाने बोलला ........
खूप हसले, आनंदले ते दोघे ..... पूर्वीचे दिवस आठवून
ती घरी आली, तिच्या नवरयाला आणि मुलाला पाहून ती भानावर आली,
मग तिला आठवल,
अरे आपल रडण तर राहूनच गेल ...................

2) प्रिय अमृता ......
तुझ वस्तुमान किती आहे, सांगशील का ?
मला माहित आहे तू, कशाला म्हणून विचारशील!
अग ...........
वस्तुमान काळालाही वाकवत म्हणतात,
सध्या माझा काळ खूप वाईट चाललाय !

3) डबक्यातल्या पाण्यात परावर्तीत झालेल्या, उगवणाऱ्या सूर्याच्या तांबड्या किरणाच्या प्रकाशाची शप्पत तुम्हाला आहे.
घोंघावणाऱ्या वाऱ्यात अडकून हेवकावे खाणारया प्लाष्टिकच्या पिशवीची शप्पत तुम्हाला आहे.
चिमणी, कावळा आणि कबुतरांच्या दीर्घ शंकेमुळे झाडाखालच्या, पांढऱ्या शुभ्र झालेल्या त्या काळ्या कुट्ट, मठ्ठ, निर्जीव दगडाची शप्पत तुम्हाला आहे.
अवकाशात आपल्याच मस्तीत, नियमांना धुडकावून, आपल्या अस्तित्वाच्या खुणा चौफेर उडवीत जाण्यारया धूमकेतूच्या शेपटीची शप्पत तुम्हाला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा